HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई । महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्वतःचा असा वेगळा ठसा उमटविला आहे. कार्यकर्ता, वक्ता, नगरसेवक, महापौर, राज्याचे मुखमंत्री असा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे. राष्ट्रीय स्वयंशिस्बद्ध सेवक संघाच्या शिस्तबद्ध शिक्षणातून त्यांच्यातील नेता घडत गेला. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद ते आता मुख्यमंत्री असा यशस्वी टप्पा गाठणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा आज ट्विटरने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्द मागे वडील आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला. देवेंद्र गंगाधराव फडणवीस महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले आहे.

त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. राजकारण हे सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे असा मा. मुख्यमंत्री महोदयांचा दृढ विश्वास असून, आजपर्यंतची त्यांची २५ वर्षांची राजकीय कारकिर्द पाहता त्यात त्यांची हीच विचारधारा ठळकपणे दिसून येते. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली. त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं.एक अनुभवी लोक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय मुत्सद्देगिरी व कौशल्य हे गुण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्रांत नावाजले गेले आहेत. त्यांना आजवर कॉमनवेल्थ संसदीय मंडळाचा ‘सर्वोत्तम संसदपटू’ यांसारखे विविध प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना विदर्भातील कार्यासाठी आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्यासाठी प्रसिद्ध व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘नागभूषण’ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

आज वाढदिवस निम्मित मुखमंत्र्यांवर सोशल मीडिया द्वारे शुभेच्छांचा वर्षाव झाला…

महाराष्ट्राचे गतिशील आणि उत्साहपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांची कष्ट आणि उत्साह यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांचे उदार व समर्पण प्रशंसनीय आहे. मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यांसाठी प्रार्थना करतो. असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, एक समर्पित नेते, जो महाराष्ट्रातील लोकांसाठी विकास व समृद्धीसाठी अथक परिश्रम करीत आहे. असे पियुष गोयल यांनी असे ट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा, प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार

News Desk

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष!– डॉ. तानाजी सावंत

Aprna

आपलं सरकार असतानाही जर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा… काँग्रेसचा सल्ला

News Desk