HW News Marathi
देश / विदेश

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांची उद्या राज्यभर निदर्शने

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या, राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या (५ मे) राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्या सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्या सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात ३ भारतीयांचा मृत्यू

News Desk

लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची वर्णी लागणार ?

News Desk

दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे हेल्थ इमर्जन्सी लागू, ५ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद

News Desk