HW News Marathi
Covid-19

अशोक चव्हाणांनी आपल्या औकातीत राहावं ! चंद्रकांत पाटलांची टोकाची टीका

मुंबई | “अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे”, असा टोकाचा इशारा आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. “चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतं? ते उगाच काहीही चुकीची माहिती देत असतात”, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा समाज उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी आज (१४ मे) टोकाच्या शब्दात टीका केली आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधताना प्रसारमाध्यमांसमोर चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: च्या राज्यासाठी काहीतरी करून दाखवावे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करायचं ते त्यांनी आम्हाला सांगू नये”, असा इशारा देताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले आहे.

अशोक चव्हाणांना कायदा कळतो कि नाही ?

चंद्रकांत पाटील यांनीही मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांवर यापूर्वीही टीका केलेली आहे. “अशोक चव्हाण यांना कायदा कळतो कि नाही ? एकत्र त्याना इतर कायदा कळत नाही. किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. ते आता केंद्राकडे बोट दाखवत आहेत. मात्र, इतकी वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही ?”, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ७२ लाखांवर पोहोचली

News Desk

देशात ४५ हजारांच्या खाली आढळले नवे कोरोना रुग्ण!

swarit

कोरोनामुक्त झालेल्यांची प्लाझ्मा देत कोरोनाग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात

News Desk