HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात भाजपला धक्के सुरुच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ३ नगरसेवकांचे हाती शिवबंधन

मुंबई | जळगाव महापालिकेतील भाजपला गळती सुरुच असल्याचं दिसत आहे. भाजपच्या आणखी तीन नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जळगाव भाजपच्या 3 नगरसेवकांचा मुंबईत पक्षप्रवेश केला. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील दहा आजी माजी नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश ताजा असतानाच आठवड्याभरातच भाजपला आणखी एक धक्का मिळाला आहे.

जळगाव महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. यापूर्वी 27 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शनिवारी आणखी तिघांनी शिवसेनेचा झेंडा हाती धरला. भाजपच्या निम्म्या नगरसेवकांचा गट शिवसेनेत गेल्याचं चित्र आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवकांचा सेनाप्रवेश झाला.

जळगाव भाजपमधून शिवसेनेत पक्षप्रवेश करणारे नगरसेवक

सुरेश सोनवणे

शोभाताई बारी

शेख हसीना बी शेख शरीफ

मुक्ताईनगरमधील नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहा आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंना आता केंद्राकडून थेट Y दर्जाची सुरक्षा

News Desk

नारायण राणेच्या उमेदवारीवर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा आक्षेप

News Desk

“लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला” – संजय राऊत

News Desk