HW News Marathi
Covid-19

पुणे शहरातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी भाजपचे नगरसेवक, आमदारांसह खासदार आता होणार ‘चौकीदार’

पुणे | पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी भाजपचे १०० नगरसेवक, ८ आमदार आणि खासदार आजपासून (२ जून) चौकीदार म्हणून काम करणार असल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बाटप यांनी म्हणाले, पुण्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आण्याकरिता ४ आयएएस अधिकाऱ्यांना शहरातील वेगवेगळ्या भाग वाटून देण्यात येईल. मात्र, भाजपचे असंख्य कार्यकर्ते काम करायला तयार आहे. लाखो लोकांना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाटप करण्याचे काम त्यांनी केले आहे. सध्या कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आता पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही बापट यांनी केले.

आजच्या बैठकीत पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तपकिर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, राजेश पांडे यांनी मनपा आयुक्त कार्यालयात कोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 63 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

राष्ट्रवादी आमदार निलेश लंकेनी पाळला शब्द, बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी २५ लाखांचा निधी मंजूर !

News Desk

राज्यात आज ८०१८ रुग्ण कोरोनामुक्त, तर नवे ६,३३० रुग्ण आढळले

News Desk