मुंबई | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सातत्याने जुंपत आहे. याच पार्श्वभूमीवर, नागपूरमध्ये बोलताना आज (१४ मे) देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. “प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, असा बोचरा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकाराला उपस्थित केला आहे.
“केंद्राने १०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच इंद्रा साहनी प्रकरणातील ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी”, अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती. त्याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. प्रत्येक गोष्टीत राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राज्यपालांना भेटून सर्व नौटंकी आणि टाईमपास सुरू !
देवेंद्र फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, “102व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणूनच केंद्राने तातडीने कोर्टात फेरविचार याचिका दाखल करून आपले म्हणणे मांडले आहे. यासाठी आम्ही केंद्र सरकारचे आभारीच आहोत.” दुसरीकडे राज्य सरकारवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले कि, “राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटून सर्व नौटंकी आणि टाईमपास सुरू आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.