HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, “माझ्यामागे ईडी लागणार नाही, मी भाजपचा खासदार”

सांगली | सध्या महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमेरा लागलाय. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे झालेला वाद ताजा असतानाच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केले आहे. माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केले.ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमात बोलत होते

चौकशी सुरु असलेला एखादा नेता भाजपमध्ये आला की त्याला अभय मिळते

या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले. चौकशी सुरु असलेला एखादा नेता भाजपमध्ये आला की त्याला अभय मिळते, असे सर्रास म्हटले जाते. मात्र, आता संजकाका पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या दाव्याला एकप्रकारे पुष्टी मिळताना दिसत आहे.

मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बाळासाहेब म्हणाले, सेना सोडली नसती तर मुख्यमंत्री….’

News Desk

राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’गेला,ठाकरे झाले भावूक…

News Desk

नितेश राणेंनी फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना करुन दिली ‘एक आठवण’!

News Desk