HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालात भाजप पिछाडीवर 

औरंगाबाद | राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आघाडी सरकार आणि भाजपसाठी महत्वाची असणारी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. १ डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान झाले. आज मतमोजणी सुरू आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांना २७ हजार ८७९ मतेे मिळवत आघाडीवर आहेत. तर भाजपचे शिरीष बोराळकर 10 हजार 973 मते मिळवत पिछाडीवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची आघाडी कायम आहे. प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांच्या पेक्षा साधारण दहा हजार मतांनी पुढे, आतापर्यत 65 ते 70 हजार मतांची छाननी झाली आहे. पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळेत शिकणा-या मुलीकडे देशी कट्टा

News Desk

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३३ वर पोहचला, तर देशात रुग्णांचा आकडा ११० वर

swarit

“दरवाढ करणे गरजेचे आहे”, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk