HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर, खडसे-मुंडेंबाबत पक्षाचा हा निर्णय

मुंबई । भाजपच्या नव्या राज्यकार्यकारिणीवर आज (३जुलै) अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नव्या राज्य कार्यकारिणीतील नाव जाहीर केली आहेत. या राज्य कार्यकारिणीत पक्षकडून एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, राम शिंदे, चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

मुख्य प्रतोद पदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. तर पंकजा मुंडे यांना पक्षकडून केंद्रात संधी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या या राज्य कार्यकारिणीच्या यादीत एकूण अध्यक्षांसह १२ प्रदेश उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, १ महामंत्री संघटन, १ कोषाध्यक्ष, १२ सचिव, ७ मोर्चाचे अध्यक्ष, ७९कार्यकारी सदस्यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

फाशी घेण्याची वेळ आणेपर्यंत एका माणसाने छळलं… एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

News Desk

नवी मुंबईतील शिवसेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

News Desk