मुंबई | “नागरिकत्व संशोधन कायदा लागू न करायला हे राज्य का तुमच्या बापाचे आहे का?,” अशी जहरी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू करण्यावरून देशभरात विरोधात आंदोलन सुरू आहे. देशातील बहुतांश राज्यात सीएए कायद्याला लागू करण्यावर विरोध दर्शविला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त काल (२ फेब्रुवारी) नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आशिष शेलार बोलताना म्हणाले की, “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की, रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. तर सीएए हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे?, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, अशी टीका केली. हा केंद्राचा काय आहे. जरा अॅडवकेट जनरलचे ओपिनियन घ्या. माहित नसेल तर अभ्यास करा?, नसेल करता येत तर माझ्यासारखे वकिल खूप आहेत, असा खोचक सल्ला देखील शेलारांनी मुख्यमंत्र्यांना दिला. पण, हा कायदा लागू करता येणार नाही, ही भूमिकाच मांडता येऊ शकत नाही,” अशी टीका शेलारांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेलारांचे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्र्यांचा ऐकरी उल्लेख केल्यावर आक्षेप घेतला आहे. तर आव्हाडांनी ट्वीट करत शेलारांवर टीका केली आहे. आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले की, “उद्धव च्या बापाचे राज्य आहे का … असे जाहीर निवेदन करणे. हे आशिष शेलार ह्यांना शोभत नाही .. आणि होय मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे … आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ….”
उद्धव च्या बापाचे राज्य आहे का … असे जाहीर निवेदन करणे @ShelarAshish ह्यांना शोभत नाही ..
आणि होय
मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे …
आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.