HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प! – आशिष शेलार

मुंबई |  राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत असून स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे.आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केलं,असं सांगितले गेले पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितलं ही, कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही.

अर्थसंकल्प राज्याचा पण जिल्हा नियोजनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे दिसते आहे. अर्थसंकल्प पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे अशा पद्धतीचा आहे. पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे. कुणाच्या विरोधात आम्ही नाही. पण पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते तर मुंबईतल्या मेट्रो कारशेडचे काय ?याबाबत काहीच बोलले जात नाही, असे ते म्हणाले.

शेलार म्हणाले,  इंद्रायणी मेडिकल सीटी बनविण्याची घोषणा केली. 300 एकर जागेत उभी केली जाणार आहे. पुण्यामध्ये जागा बघून मेडिकल सीटी आणली जातेय की पुण्यासाठी मेडिकल सिटी आणली जातेय?याच्यावर सुद्धा मनात शंका निर्माण होते. या पद्धतीचे चित्र आहे. म्हणून एकंदरीतच बघितलं तर इतर मागासवर्गीय आयोगाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केलंय. निधीची तरतूद दिसतच नाही. म्हणून हा अर्थ संकल्प स्वराज्या पेक्षा स्व हिताचा विचार करणारा आहे.

Related posts

पुणे महापालिकेचा पाणीकपातीचा निर्णय

Gauri Tilekar

नितेश राणेंना आणखी एक धक्का; सहकार विभागाने राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला

Aprna

उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी आणि आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, सोमय्यांची मागणी

News Desk