HW News Marathi
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकार दुर्लक्ष करत आहे का?

मुंबई | महिला किंवा मुली दिवसेंदिवस अधिक असुरक्षित होत चालल्या आहेत.मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील मानखुर्दमधील कोविड सेंटरमध्ये सॅनिटायझेशनचे काम करणाऱ्या तरुणाने तिथे उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या सुमारास विनयभंग केला. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोपी दीपेश साळवे याच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली आहे. या घटनेवर सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच, अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या बलात्कार आणि अत्याचाराविरोधात सरकार दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजभवनामधून भाजपचे कार्यालय सुरु”, नाना पटोलेंचा राज्यपालांवर गंभीर आरोप

News Desk

“मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे आहेत का? पाहायला पाहिजे”; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

News Desk

शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली, देशमुखांवरुन फडणवीसांचा थेट आरोप

News Desk