HW News Marathi
महाराष्ट्र

पेंग्विनच्या ‘ऑस्कर’ नावावरून भाजप आक्रमक; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला फटकारल

मुंबई | महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या या मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक केल्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकासाघाडी सरकारच्या या निर्णयावरून भाजप आणि मनसेंच्यावर टीका केली होती. यावर आता भाजपच्या भाजप नेत्या चित्र वाघ यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून व्यंगचित्र ट्वीट करत पुन्हा एकदा मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर शिवसेनेला टोला लगावला आहे. “#मराठीचा पुळका देखाव्या पुरता!” असे ट्वीट चित्र वाघ यांनी ट्वीट केले आहे. 

चित्र वाघ यांनी ट्वीट केलेल्या व्यंगचित्रात एका चौवकटीत, एक पत्रकार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे चित्र दाखविले असून यांना प्रश्न मराठी पाट्यांवर प्रश्न विचारत आहे. “मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजच्या पेंग्वीनचं इंग्रजीत नाव?, साहेबांनी मराठी पाट्या लावायला सांगितल्या आहेत. मराठी नामकरण करण्यास नाही,” असे लिहिले आहे. तर दुसऱ्या बाजूला दोन पेंग्विनचे दाम्पत्यांच्या हाता पेंग्विनचे पिल्ला हाता घेतले आहे. “ताईने किती छान नाव दिले तुला ‘ऑस्कर’बाळ”, असे आहे. 

भायखळाच्या राणीच्या बागेत ऑगस्ट २०२१ मध्ये जन्मलेल्या पेंग्विनचे मंगळवारी (१८ जानेवारी) चार महिन्यांनंतर त्यांचे बारसे केले आहे.  महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणीबागेतील थ्री डी ऑडिटोरियममध्ये केक कापून या दोन नवीन पाहुण्यांचे बारसे साजरे केले. मोल्ट आणि फ्लिपर या जोडीचे बाळ… त्याचे नाव आता ‘ऑस्कर’ ठेवले आहे. मुंबई प्राणिसंग्रहालयात पेंग्विन आणणे हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांना मुंबईत आणल्यावर या प्रकल्पाच्या खर्चावर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारने सत्तेसाठी फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, विनायक मेटेंचा गंभीर आरोप 

News Desk

लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार

swarit

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढला?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न

News Desk