HW News Marathi
महाराष्ट्र

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणच्या फ्लॅटवर जाऊन केली पाहणी

पुणे | पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणानंतर शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आणि राजकीय वातावरण तापले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत.

आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत. अकरा वाजता पत्रकारांशी बोलणार आहे, असं त्या म्हणाल्या. पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणारपूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली.

भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. राठोडांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता मी अकरा वाजता सगळं बोलणार आहे, असं वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ 1 वाजता पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.मुख्यमंत्री राठोडांना मंत्रिमंडळातून हाकलून देतील“मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील.

मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. यावेळी चित्रा वाघ राठोड यांच्या राजीनाम्यासाठी जास्त आक्रमक बघायला मिळाल्या.“मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे – सामना

News Desk

सारथी जिवंत ठेवण्याबाबत महाविकास आघाडी व शरद पवारांची जबाबदारी – छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिपादन

News Desk

देख लिया “७० साल मे कुछ नही हुआ.. देख लिया… !

News Desk