अहमदनगर | माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचा मृत्यू झाला आहे. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनावरील उपचारादरम्यान दिलीप गांधी यांची आज (१७ मार्च) पहाटे दिल्लीत प्राणज्योत मालवली.
दिलीप गांधी हे संघ परिवारात मोठे झाले तसेच भारतीय जनता पक्षाशी ते कायम एकनिष्ठ राहिले. दिलीप गांधी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. तसेच एक वेळा त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवलं. २०१९ ला लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांना पक्षाने संधी दिल्याने त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही तरीही खचून न जाता त्यांनी पक्ष उभारणीसाठी आणि सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अथक परिश्रम घेतले. २००३ ते २००४ यादरम्यान भाजप सरकारच्या कार्यकाळात दिलीप गांधी यांनी केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.२०१९ला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतरही सुजय विखे यांच्या विजयासाठी दिलीप गांधी यांनी मतदारसंघात विशेष प्रयत्न केले.
Former Union Minister and BJP leader, Dilip Gandhi passed away at a private hospital in Delhi. He had tested positive for #COVID19 and was under treatment.
(File photo) pic.twitter.com/NExHeHW0lZ
— ANI (@ANI) March 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.