HW News Marathi
महाराष्ट्र

खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच नेत्याने सुपारी दिली होती

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती. यासंदर्भात ३ वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांच्या घरी बैठक झाली, असा खळबळजनक आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला आहे. मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी कल्पना इनामदार यांनी दमानिया यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले. मी उद्योजक आहे, माझ्या मिळकतीतून मी अण्णांच्या आंदोलनाचा खर्च केला आहे. तसेच हा संपूर्ण व्यवहार मी चेक ने (Cheque) केला आहे. यात कोणत्याही भ्रष्टाचाराचा पैसा नाही. माझा सर्व आर्थिक व्यवहार आणि बँक स्टेटमेंट्स मी पोलिसांना द्यायला तयार आहे.

पोलिसांनी याची चौकशी करावी. उलट अण्णांच्या आंदोलनाला भ्रष्टाचाराचा पैसा लागला आहे, असा आरोप करून दमानिया यांनी अण्णांचा अपमान केला आहे, असे त्या वेळेस इनामदार बोलत होत्या. छगन भुजबळ यांच्यासोबत मी कधीही काम केले नाही. भुजबळ यांची चौकशी करताना ईडीने त्यांच्या नोकराला ही आरोपी केले. तर मग ईडीने माझी चौकशी का केली नाही? दमानिया यांच्या विरोधात १ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचेही इनामदार यांनी सांगितले आहे.

Related posts

माझा पक्ष रजिस्टर असूनही आम्ही भाजपच्या चिन्हावर का लढायचे ?

News Desk

“चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!”, कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांवर शेलारांचा गंभीर आरोप

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत आहे का?पवारांनी सुनावलं!

News Desk
महाराष्ट्र

भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू

News Desk

भिमा-कोरेगाव | भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी एकमेव साक्षीदार १९ वर्षीय पूजा सुरेश सावट हिचा संशयास्पद मृत्यू झाला. पूजाचा मृतदेह विहिरत आढळल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुजा सावट ही २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाली असून तिच्या कुटुंबियांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर २२ एप्रिल रोजी सकाळी पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला. पुण्यातील ससून रुग्णालयात पूजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तिच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ‘पूजा सावट ही भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी एकमेव तक्रारदार होती. पोलिसांनी तिच्या एफआयआरवर तपास केलेला नाही. तर आता तिच्या मृत्यू प्रकरणी तरी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा,’ अशी मागणी बारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

  • भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण

१ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथील वियजस्तंभाला अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी गेले होते. या अनुयायांवर जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सावटचे घर जाळण्यात आले. या हिंसाचारात पूजा सावट ही एकमेव साक्षीदार होती. तिचे घर जाळण्यात आल्यानंतर पूजाचे कुटुंब भिमा-कोरेगाव हिंसाचारनंतर जवळी वाडा नावाच्या गावात राहण्यासाठी गेले होते.

Related posts

आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, ७४२ महिला उत्तीर्ण

News Desk

पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचं राजू शेट्टींना आश्वासन!

News Desk