HW News Marathi
महाराष्ट्र

खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच नेत्याने सुपारी दिली होती

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती. यासंदर्भात ३ वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांच्या घरी बैठक झाली, असा खळबळजनक आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला आहे. मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी कल्पना इनामदार यांनी दमानिया यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले. मी उद्योजक आहे, माझ्या मिळकतीतून मी अण्णांच्या आंदोलनाचा खर्च केला आहे. तसेच हा संपूर्ण व्यवहार मी चेक ने (Cheque) केला आहे. यात कोणत्याही भ्रष्टाचाराचा पैसा नाही. माझा सर्व आर्थिक व्यवहार आणि बँक स्टेटमेंट्स मी पोलिसांना द्यायला तयार आहे.

पोलिसांनी याची चौकशी करावी. उलट अण्णांच्या आंदोलनाला भ्रष्टाचाराचा पैसा लागला आहे, असा आरोप करून दमानिया यांनी अण्णांचा अपमान केला आहे, असे त्या वेळेस इनामदार बोलत होत्या. छगन भुजबळ यांच्यासोबत मी कधीही काम केले नाही. भुजबळ यांची चौकशी करताना ईडीने त्यांच्या नोकराला ही आरोपी केले. तर मग ईडीने माझी चौकशी का केली नाही? दमानिया यांच्या विरोधात १ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचेही इनामदार यांनी सांगितले आहे.

Related posts

अनिल परबांची ईडी कडून चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी पूर्ण करायला तयार- अब्दुल सत्तार

News Desk

यंदाच्या २४ महिला आमदार विधानसभेत

News Desk

ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही

News Desk