HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा सुरुंग, १० नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन!

हिंगणघाट | नगरपालिका निवडणुकीचे वारे आता जोरात वाहु लागले असून स्थानिक नगरपालिकेतील विद्यमान १० सत्ताधारी नगरसेवकांनी कोलांटउडी घेत राज्यात सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेत आज (२१जून) रोजी प्रवेश घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधून घेतले.

शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांमार्फत भाजपा नेतृत्वावर नाराजी दर्शवित भाजपाच्या ९ नगरसेवकांनी तसेच एका अपक्ष नगरसेविकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे थेट संधान साधले असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाच्या नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्याने शहरात राजकीय भूकंप आला आहे.

या घडामोडीमधे युवा सेना जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत यांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. नगराध्यक्षांची कारकिर्द फारशी समाधानकारक नसून पक्षात राहून शहरातील विकासकामांना आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पक्षनेतृत्व अपयशी ठरल्याने आपण शिवबंधनात अडकलेल्या नगरसेवकांनी सांगितले.

शिवसेनेत पक्षप्रवेश करणार्‍या हिंगणघाट नगरपालिकेचे नगरसेवकांच्या यादीत भाजपाचे नगरपालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, शिक्षण सभापती संगीता घुसे, पाणीपुरवठा सभापती भास्कर ठवरी, स्विकृत सदस्य मनोज वरघणे, अपक्ष निवडून आलेले नगरसेवक सुरेश मुंजेवार यांचा प्रमुख समावेश आहे. यांच्यासह सतीश धोबे, नीता धोबे, नीलेश पोगले, सुनीता पचोरी, मनीष देवढे यांचाही समावेश आहे. यावेळी शिवसेना पक्ष सचिव तथा खा. अनिल देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, शिवसेना विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे व प्रशांत शहागडकर तसेच हिंगणघाट येथील युवासेनेचे जिल्हाधिकारी अभिनंदन मुनोत यांची उपस्थिती होती.

गेल्या काही महिन्यापासूनच नगरसेवकांच्या गटात नगराध्यक्षाच्या कारभाराविरोधात असंतोष खदखदत होता. स्थानिक पक्षनेतृत्व यांनी त्यांना समजाविण्या प्रयत्नसुद्धा केला. परंतु, पक्षनेतृत्वास त्यांना समजविण्यात यश आले नाही. गेल्या काही महिन्यांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात होते. संचारबंदी उठताच त्यांनी भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश घेतला.

२०१६ मध्ये आ. समीर कुणावार यांच्या नेतृत्वात भाजपाने नगरपालिका निवडणुक लढविली होती. त्यावेळी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी हे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ३८ पैकी २८ नगरसेवक निवडून आल्याने भाजपाचे बहुमत होते. पक्ष सोडून गेलेले नगरसेवक संधिसाधु असून त्याने पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी दिली.

*राष्ट्रवादीलाही धक्का बसण्याची शक्यता*

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आ. राजू तिमांडे गेल्या काही दिवसांपासून पक्षा अस्वस्थ आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कमलनाथ व आता गेल्या आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यामुळे तेही काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

News Desk

राज्यपालांच्या विमान प्रवासावरुन राज्य शासनाने दिले स्पष्टीकरण

News Desk

महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे कंबर कसून तयार!

News Desk