HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन ‘या’ भाजप नेत्याने ओळखले बांग्लादेशी

इंदुर | पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो, असा खळबळजनक दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्यानंतर देशात घुसखोरांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. घुसखोरांना कसे ओळखायचे याच्या टीप्स सीएए समर्थक जाहीर कार्यक्रमांमध्ये देऊ लागले आहेत हे कैलाश यांच्या या वक्तव्यावरुन म्हणू शकतो.

इंदूर प्रेस क्लबने आयोजित केलेल्या ‘लोकशाही, राज्यघटना आणि नागरिकत्व’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी हे वक्तव्य म्हटले. ‘माझ्या घरातली एक खोली मी हल्लीच दुरुस्त करून घेतली. त्या कामासाठी आलेले मजूर एकदा पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. ते मजूर बांगलादेशी आहेत का?  याची चौकशी मी कंत्राटदाराकडे केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत,’ अशी माहिती विजयवर्गीय यांनी दिली.

‘आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू. ज्यांना कोंबडा बनवायचा आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार केली आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोडता येत नाहीत’  अशी विजयवर्गीय यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांना धमकीही दिली होती.

Related posts

निकालानंतर पहिल्यांदा सोनिया गांधींनी शरद पवारांसोबत फोनवर केली चर्चा

News Desk

जातीचे नाव काढेल त्याला ठोकून काढेन, गडकरींचा इशारा 

News Desk

राफेलबाबत मोदी सरकार देशभरात घेणार ७० पत्रकार परिषदा

News Desk