HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचे मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, उद्या राज्यपालांना भेटणार

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्यांनी  बोगस एफआयआर विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये दाखळ झाले होते. वेबसाईटवर असलेल्या एफआयआरवर माझी सही नाही, हे खार पोलिसांनी मान्य केल्याची माहिती सोमय्यांनी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

सोमय्या म्हणाले, “वेबसाईटवर असलेल्या एफआयआरवर माझी सही नाही, हे खार पोलिसांनी मान्य केले. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मुंबई पोलीस आयुक्तांचा एफआयआर नोंदवण्यास नकार दिला आहे. बनावट एफआयआरच्या आधारावर तपासही सुरू झाला आहे. एफआयआरवर माझी सही हवी होती यांची मुंबई आयुक्तांना पूर्ण कल्पना आहे. उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून खार पोलिसांनी पेपर फाडून टाकले असून खार पोलिसांना आयुक्तांचा फोन आल्यानंतर त्यांनी पेपर फोडले,” असे त्यांनी सांगितले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ मुद्यांवर विधान सभेचं पावसाळी अधिवेशन गाजणार?

Seema Adhe

जनतेचा विचार करुन शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील – महेश शिंदे

News Desk

चंद्रकांत पाटील-अमित शहांची दिल्लीत भेट, बीएमसी निवडणुकीबाबत चर्चा – सूत्र

News Desk