HW News Marathi
महाराष्ट्र

भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेंना लाज वाटत नाही!

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. या प्रचाराचं रण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशात भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली असून रेणू शर्मा प्रकरणावरून मुंडेंना चांगलच धारेवर धरलं आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी काल (१२ एप्रिल) पंढरपुरात सभा झाली. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

यावेळी भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये रेणू शर्माप्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. “माय बहीण करवली म्हणून आली. धनंजय मुंडे म्हणाले, वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय सारखच. दोघी बहिणी बहिणी एकत्र राहावा. मग एकदा वीज कनेक्शन घेतलं की मीटर पडणारच. मीटर पडलं. दोन पोरं झाली. त्या दोन पोरांना आपलं नाव दिलं. त्यांना विचारलं अरे तू नाव कसं देतोस? तेव्हा ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामीत्वाचे स्वीकारले पाहिजे. असं सांगतानाच भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही”, अशी घणाघाती टीका ढोबळे यांनी केली.

यावरच ढोबळे थांबले नाही तर त्यांनी चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडेंवर जी टीका केली होती त्याचा आधार घेतलही धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता. “आमची चित्राताई वाघ वाघिणीसारखी हातात पायतण घेऊन उभी होती. नीट समजून घ्या”, असंही ढोबळे म्हणाले आणि भर सभेत टाळ्या पडायला लागल्या.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मला खासदार निंबाळकर यांनी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे असं सांगितलं. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही निवडणूक एका मतदारसंघाची निवडणूक असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“सर्व घटकांवर अन्याय करणारं हे सरकार आहे. या सरकारचे १०० अपराध भरले आहेत. १०० अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरच्या जनतेला, नागरिकांना मिळाली आहे. या निवडणुकीत यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा. त्याची चिंता तुम्ही करु नका,” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका पंकजा मुंडें यांची जलसंपदामंत्र्यांवर टीका!

News Desk

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक घोटाळ्याला क्लिन चिट | धनंजय मुंडे

News Desk

चित्रपट, नाटक, संगीत समीक्षकांचाही सन्मान विचाराधीन! – अमित देशमुख

Aprna