HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांचं जामिना नंतर पहिलं ट्विट! म्हणाले…..

महाड | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल(२४ ऑगस्ट) जमीन मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर नारायण राणे यांना रायगड न्यायालयात सादर करण्यात आलं. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणेंनी दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दोन शब्दात व्यक्त

नारायण रामे यांना जमीन मिळाल्यावर त्यांनी पाहिलं ट्विट केलं. नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नारायण राणे यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पहिलं ट्वीट केलं आहे. केवळ दोन शब्दात राणेंनी ट्वीट केलं. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

४ अटींवर जमीन मंजूर

नारायण राणे यांना कोर्टाने तीन अटींवर जमीन केला आहे.

– राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

– त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे.

– राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल

– 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला

नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांना दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर राणेंना रात्री 8.35च्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणे स्वत:च्या गाडीने आले होते. त्यांच्यासोबत नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते. राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

खोटी कलमं लावण्यात आली

न्यायदंडाधिकारी पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली . राणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलले आहेत , वक्तव्यामागे त्यांचा काही कट होता का , याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली . राणे हे जबाबदार व्यक्ती आहेत मग ते बेजाबाबदारपणे का वागले ?, असा मुद्दाही त्यांनी मांडला. तर राणे यांचं वक्तव्य राजकीय स्वरूपाचं आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याने त्यांना जामीन द्यावा, असा युक्तीवाद राणे यांच्या वकिलांनी केला. अटक करण्यापूर्वी त्यांना कुठलीही नोटीस देण्यात आली नाही. त्यांच्या वक्तव्यामागे कोणतंही षडयंत्र नव्हतं. पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे . खोटी कलमं लावण्यात आली आहेत . त्यांची अटक बेकायदेशीर आहे , असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

तसेच राणेंच्या प्रकृतीची माहितीही वकिलांनी न्यायालयाला दिली. सुमारे पाऊन तास दोन्ही बाजूचा युक्तीवाद सुरू होता . त्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाने केली मागणी फेटाळून लावत जामीन मंजूर केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाच्या ‘त्या’ तुम्ही तिला कधी फोन करणार? कॉंग्रेसचा NCBला प्रश्न  

News Desk

शहीद जवान रामनाथ हाके यांचे पार्थिव लातूरमध्ये दाखल

News Desk