HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपकडून निलेश राणेंवर ‘ही’ जबाबदारी

मुंबई | महाविकास आघाडी सरकारवर या ना त्यामुद्यावरून ट्वीट करून टीकास्त्र सोडणारे नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या नेत्यावर सडकून टीका करणाऱ्या निलेश राणे यांच्यावर भाजपने आता नवीन जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांची थेट प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. निलेश राणे लोकसभा निवडणूक पराभूत झाले होते. त्यानंतर वडील नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला होता.

त्यावेळी निलेश राणे हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले होते. परंतु, नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही मुलांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा पासून निलेश राणे हे ट्वीटरवरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यावर एकेरी शब्दांत सडकून टीका करताना आढळून आले. आता भाजपने त्यांच्याकडे प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. पण, आता केंद्राने ठाकरे सरकारला दणका दिला आहे. नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात आता १२ सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, शरद पवारांनी केलं सेनेचं कौतुक

News Desk

न्यायालयाचा अवमान केल्यामुळे राज्यपालांना कोर्टाची नोटीस

News Desk

“.. अनाथांची मातृदेवता हरपली ..!’  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

Aprna