मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार दिलीप कुमार यांचं काल (८ जुलै) निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेक्षेत्रातल्या आणि नेत्यांनी ट्विटद्वारे हळहळ व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी कुमारांच्या कुटुंबियांना भेट दिली. त्यांच्या या भेटीवरून आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत पुन्हा ठाकरे कुटुंबियांवर टीका केली आहे.
नितेश राणेंनी व्यक्त केली खंत
एम.पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली होती. मृत स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना भेट न देता दिलीप कुमारांच्या घरी भेट दिल्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. नितेश राणेंनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे ज्या स्वप्निल लोणकरनं आत्महत्या केली. त्या स्वप्निलच्या आईची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वेळ नव्हता. परंतु बाकीकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. दुख:द आहे पण सत्य आहे’, अशा शब्दात नितेश राणेंनी खंत व्यक्त केली.
Wish he had gone to late Swapnil Lonkar’s mother..
who died because of Maha Gov s failure..
He didn’t have the time to go there.. but had all the time to go here..
sad but true!!! pic.twitter.com/u6NCuQdnWZ— nitesh rane (@NiteshNRane) July 7, 2021
स्वप्निलच्या आत्महत्येचा कारण काय?
एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
दिलीप कुमारांचा निधनावर काय म्हणाले मुख्यमंत्री
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली. तसेच, दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शनही घेतले. त्यानंतर, सायरा बानो यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.