मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईवरून केलेल्या विधानावरून वाद निर्माण झालेला वाद चिघळत चालला आहे. यावरून कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. या वादावर आता भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करून भाष्य केले आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध कंगना पाठोपाठ शिवसेना विरुद्घ राणे असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
नितेश राणे यांनी शायरीच्या अंदाजात टि्वट करुन निशाणा साधला आहे. “कंगना तर फक्त एक कारण आहे. सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही” असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
Alert! Alert!
Kangana toh ek bahana hai..
SSR aur disha case Se dhyan hatana hai..
Baby penguin ko bachana hai..Baki kuch nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 5, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.