HW News Marathi
महाराष्ट्र

कोणतेही पद मिळविण्यासाठी मी दबावतंत्र वापरले नाही, ते माझ्या रक्तात नाही !

मुंबई | “पक्षाशी बांधिल, भाजप सोडण्याचा कोणाताही निर्णय नाही. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास,” केल्याचा आरोप भाजपच्या नेत्या आणि मांजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. “मी पक्षाची सच्ची कार्यकर्ता”, असल्याचा दावा देखील पंकजा मुंडेंनी केला. ” भाजप सोडण्याचा अफवा पसरविल्या जात असून कोणतेही पदा मिळविण्यासाठी मी दबावतंत्र वापरले नाही, आणि ते माझ्या रक्तात नाही, फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडेंनी प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

तसेच मला कोणते पद मिळू नये, म्हणून हे सुरू आहे का?, असा सवाल देखील पंकजा मुंडेंनी उपस्थित केला आहे. भाजपचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजप नेते राम शिंदे यांनी आज (३ डिसेंबर) यांनी पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी रॉयलस्टोय येथे जाऊन त्यांची भेट घेत पंकजा मुंडेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तावडे आणि शिंदे यांनी यश आल्याचे म्हटले जाते.

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव असून त्यांच्या फेसबुक पोस्ट आणि ट्विटरवरील बायोवरून पक्षावर नाराज असल्याच्या काल (२ डिसेंबर) पासून चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. या पार्श्वभूमीवर आज (३ डिसेंबर) दोघांमध्ये यावर बैठक सुरू आहेत. मात्र, आज त्यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेन्द्र प्रसाद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा भाजपचे कमळ असलेला फोटो पोस्ट केल्याने त्या भाजपतच असल्याचा संदेश दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबईतील नुकसानग्रस्तांना देखील मदत करा’, अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांना मागणी

News Desk

नागपूर शहराच्या उपराजधानी दर्जाला लक्षात घेऊन भरीव निधी देणार! – अजित पवार

Aprna

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठी वापरले जावे! – आदित्य ठाकरे

Aprna