HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडे पुन्हा एकदा मैदानात! देवेंद्र फडणवीसांसोबत मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करणार

बीड |  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या अखेर जिल्ह्यात दौऱ्यावर येत असून त्या बीडसह मराठवाड्याचा २० आणि २१ ऑक्टोबर या दिवशी दौरा करणार तर गुरुवारी त्या बीड जिल्ह्यात येत असल्याचे ट्विट केले आहे.  पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की,  मराठवाड्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा करणार असून  सुरवातीस त्यांनी नांदेड, हिंगोली, परभणी व बीड असा दौरा ठरला होता. 

 

परंतू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दौर्‍यावर येत असल्याने त्या देखील मंगळवारपर्यंत नांदेडचा दौरा संपवून फडणवीस यांच्या सोबत अतिवृष्टी पाहणी करणार असल्याचे ट्विट मध्ये म्हटलेआहे. परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर  पंकजा मुंडे यांचा  पहिलाच सार्वजनिक दौरा असून त्या पुन्हा मैदानात उतरल्या असल्याची चर्चा सुरू आहे. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाटक सुरु करण्यासाठी अडचण, कलाकार-दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला

News Desk

साईदर्शनधील 17 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट

News Desk

‘महाप्रित`ने इथिओपियाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे! –  धनंजय मुंडे

News Desk