मुंबई | शिवसेना नेत्यांच्या मागे ‘ईडी’ लागल्यानंतर आता भाजपच्या एका नेत्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात चौकशीचे संकट ओढवले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. २० दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद लाड यांनी २००९ साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी २०१४ साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. प्रसाद लाड हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
तसेच, भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.
तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना १ जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी ४ जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.