HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवसेनेची परंपरागत सत्ता काढून घेण्यासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ”, प्रसाद लाड यांचे सुचक वक्तव्य

मुंबई | गेले अनेक दिवस भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात रंगताना दिसत आहे. अर्थात भाजप नेत्यांकडून मनसेसोबत आता तरी युती होणार नाही असं म्हटलं गेलं होतं. अशात आता भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. मात्र, आजची भेट ही वैयक्तिक होती हे प्रसाद लाड यांनी जोर देऊन सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “राज साहेबांसोबत ही वैयक्तिक भेट होती. राज ठाकरेंच्या हाताला दुखापत झाली हे समजलं होतं पण कोरोनाच्या काळात भेट झाली नव्हती. त्यामुळे आज ही सदिच्छा भेट घेतली”. तसेच, मुंबई महानगरपालिका निवडणुक आली आहे त्यामुळे भाजप मनसे एकत्र लढणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी वेळ आली की उत्तर देऊ असे म्हटले. तसेच, महानगरपालिकेवर यंदा भाजपचा झेंडा फडकणारच असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. पुढे ते असंही म्हणाले की, शिवसेनेची जी परंपरागत सत्ता आहे ती काढून घेणार. त्यासाठी जे योग्य असेल आणि जे बरोबर येतील त्यांना घेऊन जाणार असे सुचक विधान यावेळी प्रसाद लाड यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहिल्यादेवींची जयंती निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चौंडी येथे जमा

Aprna

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन! ‘आरटीआय’चे पत्र ट्विट करत भाजपचा गौप्यस्फोट

News Desk

ST विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात; सरकारकडून अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव

News Desk