HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण चौकशीसाठी प्रविण दरेकर पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना

मुंबई | मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणातील चौकशीसाठी भाजप नेते प्रविण दरेकर पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरेकर हे माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आज (४ एप्रिल) रवाना झाले आहेत. मुंबई पोलिसांनी दरेकरांना नोटीस पाठवली होती. यानंतर आज दरेकर मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर होणार आहेत. पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे दरेकरांनी सांगितले.

 मुंबै बँकच्या निवडणुकीच्या वेळी दरेकरांनी प्रतिज्ञा या मजूर सहकारी संस्थेत साल १९९७ मध्ये सभासद होतो. आणि दरेकरांनी २० वर्षे मजूर असल्याचे खोटे भासवत मुंबै बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. यादरम्यान दरेकरांनी आर्थिक अफरातफर करण्यात आले. २०१५ मध्ये ‘नाबार्ड’चा प्रत्येक अहवालात मुंबै बँके घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. २०१३मध्ये ८९ अ अंतर्गत केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने मुंबै बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून यात कारवाई करण्याची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य शासनाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे लवकरच वितरण करणार! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

२० लाखांचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्था मंदावलेलीच, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

वसतिगृह, सांस्कृतिक भवनाची कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास कारवाई! – मंत्री धनंजय मुंडे

News Desk