मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज(२३ ऑगस्ट) गोविंदा पथकांसोबत बैठक होती. या बैठकीत दहीहंडी सणासाठी बंदी कायम ठेवण्यात अली आहे. मात्र असं असलं तरी ही बैठक सुरु असतानाच भाजपाचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन काहीही झालं तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच असं आव्हान राज्य सरकारला दिलं आहे.
सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही
राम कदम यांनी ट्विट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. ते म्हणले, “काही गोविंदा पथकं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की यंदा गोविंदा उत्सव जोमात, धुमधडाक्यात साजरा करता यावा. यावेळेची दहीहंडी या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही,” असं राम कदम या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
#दहीहंडी होणारच.. घरात बसुन सबुरीचे आम्हाला नकोत.. #बार उघडता त्यांना नियम लावता आणी हिन्दू सणांना विरोध ? आम्ही दहीहंडी करणारच .. pic.twitter.com/x1YB2512p3
— Ram Kadam (@ramkadam) August 23, 2021
“बियर बार, दारुचे ठेले सुरु करता. त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचं स्वागत करु, नियमांचं पालन करु. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच,” असं देखील ते म्हणाले आहेत.
दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील
सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजे, पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला आहे.
आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ
बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे… गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत… त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावी, लस घेतल्यावर देखील काही देशात लाँकडाऊन करण्यात आलंय… इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय… अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे… कारण अनेकांची हातावर पोट आहेत.. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय… आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.