HW News Marathi
महाराष्ट्र

“खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही”, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया 

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. अशात दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान, आज (२३ सप्टेंबर) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत खडसेंनी कोणतीही चर्चा झाली नाही अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

“मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले

“दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही, प्रतिबंध घालतो. त्यामुळे खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारच शिवू शकत नाही. हा विचार माझ्याही मनात शिवू शकत नाही आणि त्यांच्या मनात हा विचार येऊ शकत नाही.”

“कधी कधी क्रोध आणि रागाच्या मनात ते असं म्हणतात की मला विचार करावा लागेल. पण मी तुम्हाला १०० टक्के सांगतो की ते जेव्हा शांतपणे बसतात तेव्हा त्यांच्या मनात पुन्हा तोच विचार येतो, तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें ना रहें… जो काही त्यांच्यावर झालेल्या अन्यायबाबतची त्यांच्या वेदनेचा स्वतंत्र विचार होईल.माझ्या आयुष्यात राजकारणाची थोडी किंवा व्यक्ती समजण्याची थोडी तरी समज असेल, तर खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली, कोल्हापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती

News Desk

“महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे”-चंद्रकांत पाटील

News Desk

सेना- मनसे- भाजप – असा प्रवास करत सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये स्थिरावणार

News Desk