मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे” असे मत व्यक्त केले आहे.
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! #CBI #SupremeCourt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2020
तर, “आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?” असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.
"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!" "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे.
पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही?
कुणी त्यांना ठरवू दिले नाही?
कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 19, 2020
कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही?
पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?
सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला.याप्रकरणी
आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 19, 2020
“महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंह च्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल” असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.
Ab to Thackeray Sarkar ki Dadagiri Khatam Hogi. Anil Deshmukh should resign in #SushantSingRajput case @BJP4Maharashtra @BJP4India pic.twitter.com/VRkyN5X0GD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 19, 2020
“सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणासंदर्भात शंका कुशंका होत्या आणि त्यामुळेच सीबीआय चौकशीची अपेक्षा होती ती सन्माननीय कोर्टाने मान्यता दिली. त्यामुळे दूध का दूध पानी का पानी हे या प्रकरणात होईल आणि जे जनतेला अपेक्षित आहे तेच होईल. शेवटी मुंबई पोलीस असो बिहार पोलीस असो किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असो यांचा अंतिम उद्देश हा पारदर्शक पणे हे प्रकरण पुढे येणं.. गुन्हेगाराला शिक्षा होणे हेच आहे.. यामुळे पोलिसांमध्ये अनावश्यक जे वाद निर्माण झालेलं त्यालाही ब्रेक लागेल.. सीबीआई चौकशीतून सत्यस्थिती देशातील जनतेच्या समोर येईल.” अशी भूमिका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली.
तर भाजप नेते नितेश राणे यांनी देखील खोचक ट्विट केले आहे.
Ab Baby penguin toh giyo!!!
It’s SHOWTIME! #JusticeForSSR
— nitesh rane (@NiteshNRane) August 19, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.