HW News Marathi
महाराष्ट्र

“शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे…”, शिवेंद्रराजे यांचे मोठे विधान

मुंबई | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याने राजकीय वातावरण बदलले आहे.“शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे. त्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, मात्र गावांचा तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल,” असं विधान भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांच्या या नव्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, शिवेंद्रसिंहराजे यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने साताऱ्यात सध्या जोर धरला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये येण्यासाठी यू-टर्न घेतल्याचीही चर्चा ही जिल्ह्यात आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच शिवेंद्रराजे यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार, असं बोललं जात आहे.

मुंबईतील सरपंच परिषद या संघटना व जावळी तालुक्याच्या वतीने सरपंच व करोना योद्धा म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या सरपंचांचा मेढा (ता जावळी) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी हे विधान केलं. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जावळी येथे शेतकरी मेळाव्यात जाहीर धमकी दिली होती. ‘माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,’ अशा शब्दांत शिवेंद्रराजे भोसले यांनी आव्हान दिलं होतं.

“माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे,” असंही शिवेंद्रराजे शशिकांत शिंदेंना उद्देशून म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रीच्या प्रसादातून १०० जणांना विषबाधा

swarit

मुख्यमंत्र्यांनी हातात मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले!

Aprna

राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक

News Desk