HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यातील ऊसतोड कामगारांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची सरकारकडे मागणी | सुरेश धस

बीड | कोरोनाचा  संसर्ग देशसह राज्यात वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी तर केंद्र सरकारने  २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर राज्यातील ऊसतोड कामगार हाल झाले. तर राज्यातील ऊसतोड कामगारांना १०० कोटीच्या पॅकेजीचे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

सुरेश धस म्हणाले, की, परराज्यातील ऊसतोड कामगारांच्या सोयीसाठी राज्य सरकारने ४५ कोटींची तरतुद करत आहे. मात्र, राज्यात विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने यांच्यासाठी १०० कोटींच्या पॅकेजची जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेर ठाकरे सरकार हे राज्यातील ऊसतोड कामगारांसंदर्भात उदासीन असल्याचा आरोपही धस यांनी केले आहे.

सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील या ऊसतोड कामगार रस्त्यावर चालत राहिले. तर सध्या महाराष्ट्र कोरोनाबाधितांच्या संख्येत देशात दुसरा आहे. पण जर या ऊसतोड कामगारांच्या राहण्याची सोय नाही केली तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या नंबरवर येईल अशी भीतीही धस यांनी व्यक्त केली आहे. यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी काम करत होते. त्या ठिकाणच्या कारखान्यात त्यांच्या राहण्याची सोय करण्याचा सल्लाही धस यांनी सरकाला दिला आहे.

 

Related posts

हिंगणघाटमधील मृत बहिणीला वाचवू शकलो नाही !

rasika shinde

संभाजी भिडेंना २६ मार्चपर्यंत अटक करण्याचे अल्टिमेटम

News Desk

पक्षी फडफडायला लागला की समजायचे नेम अचूक बसलाय !