HW News Marathi
महाराष्ट्र

गोदापात्रातील नियमबाह्य वाळू उपशाविरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आमदाराचा एल्गार

बीड | भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी पुन्हा एकदा नियमबाह्य वाळू उपशाविरोधात एल्गार पुकारला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून त्यांनी नियमबाह्य वाळू उपसा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर अनेक वेळा निवेदन तक्रार देऊनही कारवाई न केल्याने आमदार पवार यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्याचं म्हटलंय.

यावेळी आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी शासनाने दिलेल्या वाळू घाटातून वाळूचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे. मात्र, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तीन-तेरा करून, संबंधित ठेकेदार व वाहतूक करणारे गुत्तेदार मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा व वाहतूक करून शासनाची दिशाभूल करीत आहेत. ठेकेदाराकडून सर्रासपणे नियमांचे उलंघन होत असून वाळूची अपसेट किंमत कमी करूनही वाळू चढ्या दरानेच विक्री करीत आहेत. सर्वच वाळू घाटांवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उलंघन केले जात आहे.

वास्तविक पहाता वाळू घाटांवर मजुरांच्या सहाय्याने वाळू उपसा होणे आवश्यक आहे. असे असताना संबंधित ठेकेदारांनी केन्या, पोकलेन , जे.सी.बी. सारख्या यंत्राच्या साहाय्याने वाळुचा उपसा केला आहे. वाळू घाटांवर सी.सी.टी.व्ही. बसवण्यात आलेले नाहीत. वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जी.पी.एस. बसवले नाहीत. रॉयल्टीची पावती देताना एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. सगळा प्रकार संशयास्पद आहे.

त्याचबरोबर वाळुचे ठेकेदार एकाच पावतीवर दूरवरचे ठिकाण दाखवून दिवसभरात स्थानिक ठिकाणीच चार ते पाच खेपा करून वाळुची साठवणूक करून विक्री करीत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो आहे. वाळू वाहतुक करणाऱ्या कोणत्याही वाहनांची तपासणी सक्षम अधिकाऱ्या मार्फत केली जात नाही. टोल नाक्यावर पथकाची नेमणूक केलेली नाही.

शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करूनच वाळू उत्खनन व वाहतूक करणे आवश्यक असताना, शासन आणि प्रशासनाच्या आलबेल कारभारामुळे वाळू ठेकेदार नियम पायदळी तुडवून गोदापात्रात धुमाकूळ घालू लागलेत. या संदर्भात वेळीच लक्ष देऊन नियमबाह्य उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी नियमबाह्य सुरू असलेल्या वाळू उपश्याची पोलखोल करत आमदार लक्ष्मण पवार यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करु नये!- बाळासाहेब थोरात

News Desk

केज नगरपंचायत निवडणूक कमळाशिवाय होतेय ‘हे’ कुणीतरी अमित शहांपर्यंत पोहचवा! – धनंजय मुंडे

Aprna

“मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता पण आता…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk