HW News Marathi
Covid-19

भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून कार्यकर्त्याला बेदम मारहाण

मुंबई | औरंगबादेत भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वॉर्डामध्ये निर्जंतुकीकरण केल्येने भागवत कराड यांच्या मुलांनी मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते कुणाल मराठेंनी केल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. औरंगाबाद येथील कोटला कॉलनीमध्ये काल (२३ मे) ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हीडिओ सध्या सोश मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणी खासदार कराड यांच्या दोन मुलांसह एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मठारेंच्या तक्रारीवरून हर्षवर्धन भागवत कराड, वरुण भागवत कराड आणी पवन सोनवणे यांच्याविरोधात घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आज (२४ मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

या प्रकरणी मराठे हे बांधकाम ठेकेदार म्हणून काम करत आणि भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करतात. मराठेंनी तक्रारी म्हणा, समता नगर भागात काल (२३ मे) कोरोनाचे रुग्ण सापडल्याने त्यांनी वॉर्डात निर्जुंतकीकरणाचे काम केले. यानंतर कुणाल घरी गेल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास कुटुंबियांसह जेवण करीत असताना दरवाजा ठोठावण्यात आला. तसेच दरवाज उघडल्यानंतर हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवन सोनवणे हे तिघे मराठे यांच्या घरात घुसले. तू वॉर्डामध्ये फिरायचे नाहीस, कारण येत्या मनपा निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार असल्याने मी लोकांना मदत करत असतो, असे म्हणत तिघांनी तू लोकांना कोणतेही मदत कार्य करायचे नाही आणि कुठलेही काम करायचे नाही, असा दम भरला. त्यानंतर मराठे यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकीही दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

News Desk

पुणेकरांनो लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार!

News Desk

कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन पुणे शहरातील निर्बंध शिथिल-अजित पवार

News Desk