HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू | संभाजी महाराज

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय  पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे नाराज मराठा विद्यार्थ्यांनी गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनास बसले आहेत. या विद्यार्थ्यांची आज (१५ मे) भाजपचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली असून विद्यार्थ्यांचे मागण्या ऐकून घेतल्या आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा मागणी, संभाजी महाराजांनी प्रसार माध्यामांशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात लवकरात लवकर अध्यादेश काढावा व या विध्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे देखील महाराज म्हणाले राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण काही त्रुटींचा फटका वैद्यकीय विद्यार्थ्यांना बसला असून आता हे आरक्षण न्यायालयात टिकेल हे सिद्ध करण्याची वेळ सरकारवर आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन महाराजांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असूनही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही, हे या सरकारचे अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार? अशी टीका अजित पवारांनी सरकारवर केली.

Related posts

महापौरांची गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये, दंडात्मक कारवाई ?

News Desk

आषाढी एकादशींनिमित्ताने पंतप्रधान मोदी, बिग बींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा

News Desk

मोदींचे सरकार आले, आता अयोध्येत राम मंदिर होणारच !

News Desk