HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले खासदार संभाजीराजे यांचे आमरण उपोषण मागे

मुंबई | भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेतल्याचे संभाजीराजेंनी घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे हे उपोषणाला बसले होते. गेल्या दोन दिवसापासून संभाजीराजे हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. संभाजीराजेंनी आज (२८ फेब्रुवारी) तिसऱ्या दिवशी उपोषणाच्या मागे घ्यावे, म्हणून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख भेट घेतली. 

एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्याचे लेखील उत्तर सर्वांसमोर वाचून दाखवले. राजेंनी सात मागण्या केल्या असून त्यात आम्ही आणखी मागण्याची भर करून पूर्ण केल्या आहेत. या मागण्या लवकरपूर्ण करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यानंतर संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच

News Desk

जाणून घ्या… राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ १३ नव्या मंत्र्यांची पार्श्वभूमी

News Desk

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर, सामनातून भाजपवर टीका

News Desk