HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

उदयनराजे भोसलेंचे भाजपत योगदान किती?, संजय काकडेंचा सवाल

पुणे | महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. या सात जागांवर भाजपमध्ये रस्सी खेच सुरू आहे. मात्र, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, उदयनराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाजपचे खासदार संजय काकडे यांनी आक्षेप घेतला आहे. काकडेंनी पुण्यात आज (२१ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत उदयनराजेंवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, काकडे म्हणाले की, “उदयनराजेंचे भाजपत योगदान किती? असा सवाल उपस्थित केला आहे. काकडेंनी पुन्हा एकदा भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी सरळ सरळ दावा ठोकला आहे. काकडे पुढे म्हटले, “उदयनराजे पक्षात आले आणि पडले.  त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आले नाही. हरलेल्या व्यक्तीला मंत्रीपद कसे मिळेल,” असा प्रश्न काकडेंनी उपस्थित केला.

संजय काकडे हे उदयनराजे भोसलेबाबत नेमके काय म्हणाले

पत्रकार परिषदेत काकडे म्हणाले की, “‘मी यावेळी सहयोगी म्हणून नव्हे तर भाजपकडून इच्छुक आहे. पुणे महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या जोरावर, मेरिटवर मला पक्ष उमेदवारी देईल याची मला १०० टक्के खात्री आहे,’ असे ते म्हणाले. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे. म्हणून ते सरस होई शकत नाही. पक्षाच्या दृष्टीने पाहिले तर उदयनराजेंपेक्षा मी जास्त कामे केली आहेत. पण जर ते महाराजांचे वंशज आहे तो निकष लावला तर आम्ही त्यांची बराबरी होऊ शकत नाही. पण आम्ही देखील सुभेदार आहोत. मात्र, उदयनराजे राष्ट्रवादीतून पक्षात आले आणि पडेल. त्यांचा त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आले नाही. हरलेल्या व्यक्तीला मंत्रीपद कसे मिळेल, असे सवाल काकडेंनी उपस्थित केला. काकडे पुढे म्हणाले की, उदयनराजेंना ८० वर्षांच्या व्यक्तीने पाडलं जे दहा वर्षं राजकारणात नव्हते. अशा श्रीनिवास पाटील यांनी पराभूत केले. माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मोदी आणि शाह. मी त्यांना म्हटले, की तुम्हीच माझ्या वतीने मोद शाहांना भेटा. मला फडणवीस डावलतील असे वाटते नाही, डावलल्यावर बघू, असेही काकडे यावेळी म्हणाले.

Related posts

‘ते’ १५ लाख लोकांच्या खात्यात हळूहळू जमा होतील !

News Desk

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी नाम फाऊंडेशनकडून केंद्र-राज्य सरकारला प्रत्येकी ५० लाखांंची मदत

अपर्णा गोतपागर

माझे सध्या वाईट दिवस, चांगले काम करताना त्रास होतो !

अपर्णा गोतपागर