HW News Marathi
Covid-19

“आता इंजेक्शन्स कुठेयत? मी कारवाईला घाबरत नाही”

मुंबई । राज्यात एकीकडे रेमीडिसिव्हीरचा प्रचंड तुटवडा असताना भाजपचे खासदार सुजख विखे पाटील यांनी इंजेक्शनचा साठा आणून परस्पर वाटला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण प्रचंड गाजले. काहींनी सुजय विखेंचे कौतुक केले आहे तर काहींनी टोकाची टीका करत प्रश्न उपस्थित केले. तसेच या प्रकरणी याचिका दाखल झालेल्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर, खासदार सुजय विखे पाटील यांनी आता आपली भूमिका मांडली आहे.

“मी कारवाईला घाबरत नाही. जनतेसाठी काम करतो आहे. जी इंजेक्शन्स आणली ती ४ दिवसांपूर्वीच वाटली आहे, आता इंजेक्शन्स कुठेयत?” असा उलट आणि खोचक सवालही सुजय विखे यांनी उपस्थितीत केला आहे. त्यापुढे “आता नुसते रिकामे डबे उरलेलेत, ते घेऊन जायचे असतील तर जा”, असेही पुढे विखे म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी बोलताना सुजय विखे अगदी रिलॅक्स दिसले कारवाईचा किंचितही ताण त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मी बाहेरच्या लोकांना उत्तर देणार नाही !

आपण कारवाईला घाबरत नसल्याचे सांगत पुढे सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, “आम्ही बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून नगरमध्ये काम करत आहोत. गेली ५० वर्ष झाली आहे. नगरच्या लोकांना याबद्दल सगळे काही माहिती आहे. त्यामुळे मी बाहेरच्या लोकांना उत्तर देणार नाही. माझ्यामुळे ज्या रुग्णाचे जीव वाचले ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.”

गनिमी काव्यात सुजय विखे स्वतः च अडकणार की सहीसलामत सुटणार ?

संपूर्ण प्रकरणानंतर “तुटवडा असताना सुजय विखेंना हे इंजेक्शन मिळालेच कसे?”, असा सवाल उपस्थित झाला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. यावेळी सुजय विखे पाटील यांनी परदेशातून आणलेली औषधे किंवा इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला. मात्र, आता इंजेक्शन उरलीच नाही रिकामी डब्बे असल्याचे माध्यमांशी बोलताना विखेंनी सांगितले. त्यामुळे न्यायालयात या प्रकरणाचे पुढे काय होणारे ? या गनिमी काव्यात सुजय विखे स्वतः च अडकणार की सहीसलामत सुटणार ? हे पाहणे महत्त्वाचे असेल

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ वर्षांवरील मुलांना लवकरच मिळणार कोरोना लस

News Desk

#AyodhyaRamMandir | राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे, रोहित पवारांची भावनिक साद

News Desk

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज पत्रकार परिषद

News Desk