HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दानवेंच्या घरी महत्वाची बैठक!

नवी दिल्ली। भाजप खासदारांची उद्या(९ ऑगस्ट) दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच सोमवारी सायंकाळी सात वाजता भाजप खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व भाजप खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.

भाजपच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण

भाजपच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

भेटीबद्दल मोदी- शहांना सांगू

एकीकडे जिथे भाजप खासदारांच्या गुप्त भेटी होत आहेत, तिथेच दुसरी कडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भेटीघाटी सत्र सुरू आहे. तर काल देखील चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात भेट झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून राज यांच्यासोबत झालेल्या भेटीतील तपशीलावर चर्चा करणार आहे.

दिल्लीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, मंत्री डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार आणि इतर नव्या मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यासाठीच दिल्लीत आलो आहे. इतक्यात काही संघटनात्मक बदल होतील असं वाटत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल आणि श्रीकांत भारतीय उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात योगा दिन उत्साहात साजरा

swarit

आज तिन्ही सेनादलांची संयुक्त पत्रकार परिषद

News Desk

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडणार, भाजपची अग्निपरीक्षा

News Desk