HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्ताने पंकजा मुंडेंचा ‘सेवा संदेश’; व्हिडिओ प्रचंड व्हायरल

बीड | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दरवर्षी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी १२ डिसेंबरला एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक आगळा वेगळा संकल्प केला आहे. तो संकल्प ऊसतोड कामगार, कष्टकरी आणि वंचितांच्या सेवेचा आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुकवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर करून त्यांनी त्यांना वर्गाला आवाहन केले आहे.

गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.

पंकजा मुंडेंनी व्हिडिओत नेमके काय म्हटले

विशेष म्हणजे स्वतः पंकजा मुंडे या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत. यासंदर्भात एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. पंकजु मुंडे म्हणाल्या आहे की, “यंदा सेवेचा संकल्प करुयात. यावेळी आपण काही वेगळं करुयात. कष्टकरी, मजुरांकडे जा, त्यांची सेवा करा. त्यांना घरातून डबा बनवून न्या आणि खायला घाला, त्यांच्या डब्यातले तुम्ही ज्यांचं मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते असे कार्यक्रम करतील. आपण केलेल्या उपक्रमाच्या भावना माझ्या सोशल मीडियावर व्यक्त करा. जेव्हा तुम्ही हे काम करत असाल त्यावेळी मी उसतोड कामगारांसोबत हा दिवस घालवणार आहे. हा दिवस कष्टकरी लोकांसाठी साजरा करायचा आहे. हे ज्यावेळी आपण साजरं करू त्यापेक्षा मोठा आनंद कोणताही नाही, असं पंकजा मुंडे यांनी या व्हिडीओ माहे म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकनाथ खडसेंविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने, ते ईडीला घाबरत नाहीत”, राष्ट्रवादीचं वक्तव्य

News Desk

राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit