HW News Marathi
महाराष्ट्र

नव्या वर्षात पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाची विजयी पताका फडकली!

बीड | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना राजकीयदृष्ट्या २०२२ हे नवीन वर्षे यशाचं जाणार असून दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या “दीनदयाळ पॅनल”च्या सर्वच्या सर्व जागा प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. हा निकाल म्हणजे जिल्हयात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीतील विजयाची नांदी ठरणारा आहे. त्याचाही राजकीय अंदाज त्यांच्याच नेतृत्वाभोवती फिरतो आहे. दरम्यान, विरोधकांनी प्राथमिक स्तरावर बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पारदर्शक कारभार व पंकजा मुंडेच्या नेतृत्वाचा विश्वास ज्यामुळे विरोधकांची थोडीही डाळ शिजली नाही.

या बँकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा विरोधकांनी पॅनल उभा करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला होता. मात्र, एका विशिष्ट विचाराच्या मंडळींनी एकत्रित येवून विरोधकांची डाळ शिजू दिली नाही. परिणाम म्हणून निवडणूक पूर्व चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. ज्यात पंकजा मुंडेयांचा समावेश होता. बँकेची स्थापना झाल्यापासून या बँकेनी आर्थिक क्षेत्रात क्रांती करत पंडित दीनदयाळ यांच्या विचाराचा वारसा चालवत गरजुंना न्याय मिळवून दिला. सभासदांचा विश्वास संपादन केल्याने अनेक निवडणुका बिनविरोध निघाल्या. यंदाची निवडणूक तशी पाहता बिनविरोध म्हणावी लागेल. मात्र, केवळ पंकजांनी विरोध म्हणून विरोधकांनी सुरूवातीला पॅनल टाकण्यासाठी चाचपणी केली होती, पण पंकजा मुंडेच्या कुशल नेतृत्वामुळे त्यांचा टिकाव लागला नाही. संचालक पदाच्या एकूण १५ जागा पैकी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. काल (२ जानेवारी) सर्वसाधारण गटासाठी १० आणि ओबीसी गटासाठी ०१ अशा एकूण ११ जागेसाठी मतदान झाले.

दीनदयाळ पॅनलचा एकहाती विजय

मकरंद कुलकर्णी (२४९७), राजाराम धाट (२४९४), बाळासाहेब देशपांडे(२४५३), विवेक दंडे (२४५३), मकरंद पत्की (२४४१), चैनसुख जाजू (२४०३), राजेश्वर देशमुख (२३८५), बिपिन क्षीरसागर(२३७४), अशोक लोमटे (२३३४), विजयकुमार कोपले (२३१४), राजाभाऊ दहिवाळ (२३७५) बिनविरोध विजयी संचालक – पंकजा मुंडे, शरयू हेबाळकर, किशन पवार, जयकरण कांबळे

पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली विजयाची पताका 

ही निवडणूक विरोधाला विरोध म्हणून झाली. पण, सभासदांनी पंकजा मुंडेच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास टाकला. नव्या वर्षाच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली विजयाची पताका फडकली. काही दिवसापुर्वी वडवणी, आष्टी, शिरूर, पाटोदा नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्याची मत मोजणी पंधरा दिवसांनी असली तरी बंद मतपेटीत पंकजाताईचं नेतृत्व मतदारांनी शाबुत करून ठेवलं आहे. चारही नगर पंचायतीमध्ये पंकजाताईच्या नेतृत्वाखाली भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचे पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांत राहूनही चांगले काम करता येते, त्यासाठी घसा फोडण्याची गरज नसते

News Desk

“…गरीबांच्या घरी जेवण नाय”; ‘मविआ’च्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Aprna

‘राष्ट्रीय युवक दिना’च्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

News Desk