HW News Marathi
महाराष्ट्र

“भास्कर जाधव हे नरकासुर आणि उद्धव ठाकरे देखील सोंगाड्या”, नितेश राणेंची जहरी टीका

मुंबई। विधानसभेत भाजपच्या १२ आमदाराचं गोंधळ घातल्या प्रकरणी निलंबन करण्यात आलं. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी आता टीका केली आहे. भास्कर जाधव हे नरकासुर असून सोंगाड्या आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे.या आमदारांचं निलंबन झाल्यापासून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी आज (६ जुलै) ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही कोकणातले आहोत जाधवही कोकणातले आहेत. दशावतार असतात कोकणात. त्यात नरकासुर असतो. तो वेगवेगळे सोंग बदलतो. सोंगाड्याही असतो त्यात. जे जे भास्कर जाधवला ओळखतात त्याना माहीत आहे ते सोंगाड्या आहेत. ते नरकासुरासारखे आहेत. ते एकच सोंग कधीही ठेवत नाही.

काल(५जुलै) त्यांना कोणीही शिवी घातली नाही. कोणीही काहीही केलं नाही. पण तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासुर कसा असतो. तसे हे भास्कर जाधव आहेत. आमच्या सारखे लोक त्यांना चांगलं ओळखून आहे. ते काय काय करतात ते आम्हाला माहीत आहे, असं सांगतानाच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान एका सोंगाड्या माणसाने केला आहे. त्यांना काहीही झालं नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले का नाही? त्यांनी स्वत:चे कपडे का नाही फाडून घेतले. माझे बंधू निलेश राणे त्यांना चांगले ओळखतात, असं नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे देखील सोंगाड्या !

पुढे बोलतांना नितेश राणे म्हणाले की भास्कर जाधव जसे सोंगाड्या आहेत. तसे मुख्यमंत्रीही सोंगाड्या आहेत. एक सोंगाड्या वर बसलेला होता. तर दुसरा खाली. मुख्यमंत्री सभागृहात काहीच बोलत नाही. कारण तेही सोंगाड्याच्या भूमिकेत आहेत, अशी टीका त्यांनी केली. तर भाजपचे १२ आमदार ओबीसींच्या आरक्षणासाठी लढले म्हणून आता आम्ही लोकांमध्ये जाऊन आमचं म्हणणे मांडू असेदेखील नितेश राणे म्हणाले.

सभागृहात काय घडलं?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (५ जुलै) विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

भाजपच्या या १२ आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबईत भाजपला धक्का, आजी, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

News Desk

Shame on ‘The Quint’! अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहिता पेक्षा मोठे कधीच असू शकत नाही.

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्ताने पंकजा मुंडेंचा ‘सेवा संदेश’; व्हिडिओ प्रचंड व्हायरल

News Desk