HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांवर भाजपकडून आता मोठी जबाबदारी!

मुंबई। विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांवर ही जबाबदारी सोपवली आहे. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजपनं 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी आपले प्रभारी घोषित केले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाचरी राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस हे भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील यावेळी फडणवीस यांच्यासोबत जी. किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांच्याकडे सह प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुन्हा एकदा गोव्यात सत्ता स्थापन करु

फडणवीसांना विजयाचा विश्वास

गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा एकदा गोव्यात सत्ता स्थापन करु. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं गोव्यात जे काम केलं आहे. त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू. आमचे लाडके पर्रिकर यावेळी नसतील पण त्यांनी पक्षाला दाखवलेला मार्ग आणि दिशा कायम ठेवत आम्ही वाटचाल करु. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी राहिला आहे. अमित शाह, नितीन गडकरी हे आमच्या पाठीशी आहेत. दोन केंद्रीय राज्यमंत्रीही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही गोव्यात सत्ता मिळवू असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय.

तर उतर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रधान यांच्यासोबत अनुराग ठाकूर, अर्जुन मेघावाल, सरोज पांडेय, शोभा कंदरलाजे, कॅप्टन अभिमन्यू, श्रीमती अन्नपूर्ण देवी आणि विवेक ठाकूर यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी!

News Desk

पत्रकार व डाॅक्टर यांच्यावरील होणारे हल्ले हे समाज स्वास्थ बिघडविणारे आहेत –  कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna