HW News Marathi
Covid-19

पुण्यात लागू नव्या नियमांवर भाजपला आक्षेप, सुचविले हे नवे पर्याय

पुणे । राज्यातील मुख्य शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. पुण्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (२ एप्रिल) पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी, पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नसले तरी निर्बंध कडक करणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती अशी की, “पुण्यात दिवसभर जमावबंदी तर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी लागू असेल. हे सर्व नियम उद्यापासून (३ एप्रिल) संपूर्ण जिल्ह्यात लागू होतील.”या पार्श्वभूमीवर, संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीला विरोध करताना रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी करा, अशी मागणी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे.

पुण्यात पुढील ७ दिवस अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यातील शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील ७ दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. गिरीश बापट यांनी याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका मांडली.

लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा !

“पुण्यात जे नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातील दोन-तीन गोष्टींना आमचा विरोध आहे. पोलिसांनी कायदा घातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा”, अशी मागणी बापट यांनी केली आहे. त्याचसोबत, “पीएमपीएमल बस बंद करण्यासही भाजपने विरोध दर्शवलाय. बस बंद झाली तर कामगार वर्ग प्रवास कसा करणार? त्यामुळे 40 टक्के क्षमतेने पीएमपीएमएल बस सुरु ठेवाव्यात”, अशी मागणी बापट यांनी केली आहे.

हॉटेल्स पूर्ण क्षमतेने बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या !

हॉटेल्सबाबतच्या निर्णयाबाबत बोलताना गिरीश बापट म्हणाले, “हॉटेल्स पूर्ण क्षमतेने बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या अशी मागणी भाजपनं केलीय. संचारबंदी नको तर जमावबंदी असावी”, अशी मागणी भाजपने केली आहे.”लोकांना रेशन द्या. काही द्यायचे नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही”, अशी टीकाही गिरीश बापट यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

News Desk

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे ! । वडेट्टीवार

News Desk

दिलासादायक ! रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर

News Desk