HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदांची ऑफर ?

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांची आज (३० ऑक्टोबर) भाजपच्या नेते पदी निवड करण्यात आली. “अफवांवर विश्वास ठेवू नका, पुढील पाच वर्षी महायुतीचेच सरकार स्थापन होणार, ” असा दावा फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदारांशी सोबांधित करताना म्हणाले. या बैठकीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदे देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने दिलेल्या ऑफरवर शिवसेना काय भूमिका घेईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपने स्वत:कडे मुख्यमंत्री पद आणि २६ मंत्रीपदे ठेवली आहेत. मुख्यमंत्री पद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कोणत्याही भाजप शिवसेनेला देण्यास तयार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या कलगीतुरा रंगला आहे.५०-५० फॉर्म्युला हा लोकसभेवेळीच ठरला असल्याचा दावा, राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हा शिवसेनेचा हक्क, असे म्हणत त्यांनी भाजपला धमकी वजा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. फडणवीस यांची नेते पदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मित्र पक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे देखील आभार मानले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाच्या विधानसभेत पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे आमने-सामने

News Desk

भाजपने उद्धव ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य शोधलं! 5 पोलिस ठाण्यात तक्रार करणार

News Desk

DCP सौरभ त्रिपाठी अंगडिया खंडणी प्रकरणाची उद्या सत्र न्यायालयात होणार सुनावणी

Aprna