HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब केल्याने भाजपचा हल्लाबोल

मुंबई | शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजपने हल्लाबोल केला आहे. “शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

“शिवसेनेने एक महिन्यापूर्वी अजान स्पर्धा घेतली. तेव्हाच मी म्हटलं होतं, शिवसेनेने भगवा तर सोडलाच, पण हिरवा हाती घेणं बाकी आहे. आता तर वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने चक्क उर्दूमध्ये नव्या वर्षाचं कॅलेंडर काढलं. एव्हढंच नव्हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नामकरण करुन हिंदुहृदयसम्राट ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब असा उल्लेख केला. उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे, चंद्रोदय, सूर्योदय देण्याचं काम केलं. एव्हढंच नव्हे छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीच्या दिवशी फक्त शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस सुद्धा या कॅलेंडरमधून करण्यात आला आहे. याचा मी निषेध करतोच. औरंगाबादचं संभाजीनगर नाही, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने करुन दाखवलं”, असं अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

तर दुसरीकडे,  भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही टोमणा मारला आहे. कॅलेंडरवरील अशा काही गोष्टींमुळे भाजपाकडून शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. “हिंदुह्रदयसम्राट ते ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’! अजान स्पर्धेनंतर शिवसेनेच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मा. बाळासाहेब ठाकरे मा. उद्धवजी ठाकरे यांचे त्यांच्या “खास शैलीत” अभिनंदन करत असतील!”, असा टोमणा षार भोसले यांनी लगावला आहे.

कॅलेंडरमध्ये नक्की काय लिहिले आहे?

या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं लिहिलं आहे. कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना असंही नमूद करण्यात आलं आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कॅलेंडरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुहृदयसम्राट ही पदवी हटवून त्याजागी जनाब बाळासाहेब ठाकरे असा नामोल्लेख करण्यात आला आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या नावांबाबतची असंच करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपवा, पुणे न्यायालयाचे आदेश

swarit

धनंजय मुंडे आणि माझ्यात गैर काही झालंच नाही, रेणू शर्माचा खुलासा

News Desk

HW Exclusive : कोरोनाशी झुंज देणाऱ्या त्या कोरोनामुक्त लढवय्यांचा प्रवास

swarit