HW News Marathi
महाराष्ट्र

ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही…!

मुंबई | “गेली ५ वर्ष मंत्री असताना ज्याला स्वत:च घर आणि ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, अशा व्यक्तीच्या वक्तव्याने पक्षाला काही फरक पडणार नाही”, असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या तोफ डागली. काकडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती पंकजा मुंडेंवर अनेक आरोप केले आहे. “पंकजा मुंडेंनी पक्षाने माझ्याबद्दल निर्णय घ्यावा, असे वक्तव्य केले, मी त्याचा निषेध करतो. एकीकडे त्या म्हणतात की, पक्ष माझ्या बापाचा आणि दुसरीकडे म्हणतात की, पक्षाने निर्णय घ्यावा. पण पक्ष सगळ्यांच्या बापांचा आहे”, असे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यावर टीका करताना काकडे म्हणाले.

काकडे पुढे म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात दोन कॅबिनेट आणि दोन महत्वाहीचे खाते असताना, त्यांचा ३० हजार मताधिक्यानी पराभव होतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने पक्षाला काही हाणी होणार नाही. त्याचप्रमाणे पाच वर्ष मंत्री असताना ज्याला स्वत:च घर सांभाळता आले नाही, ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, घरात एक खासदार, एक आमदार असताना. ज्याला गोपीनाथ मुंडेसारख्या व्यक्तीचे वलय असताना, देखील त्यांचा पराभव झाला असून त्यांना पराभव पचविता येत नाही. त्यांच्यामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही,” असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर तोफ डागली.

पंकजा मुंडेंच्या मनातून भाजप पक्ष दूर झाले आहे. पंकजा मुंडेंनी काल (१२ डिसेंबर) जातीपातीचे राजकारण केले. पंकजा मुंडेंनी कोणालाच जवळ केले नाही. मराठा समाज, मुस्लीम समाज, ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच त्या पराभूत झाल्या. पाच वर्ष जर त्यांनी काम केले असते. तर या मेळाव्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मुंडे यावेळी म्हणाल्या की, मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला काढून टाकायचे असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा काकडेंनी निषेध केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत, पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र

News Desk

तासगावात चिकनगुनियाची साथ, नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष  

News Desk

संभाजी निलंगेकरांकडून ७६ कोटीचे कर्ज अवघ्या २५ कोटीत सेटलमेंट

News Desk